१ जानेवारी

१ जानेवारी - दिनविशेष

डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर: यांचा जन्म १ जानेवारी १९४३ मध्ये गोवा या राज्यातील माशेल गावात झाला. त्यांना रमेश माशेलकर या नावानेही ओळखले जाते. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR)या संघटनेचे माजी अध्यक्ष होते.

सत्येंद्रनाथ बोस (बंगाली) (१८९४-१९७४) भारतीय शास्त्रज्ञ: बोस-आइन्स्टाईन जोडीतील विश्वविख्यात शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ यांचा जन्म जानेवारी १ १८९४ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ हे रेल्वेत नोकरीला होते. सत्येंद्रनाथ यांचे शालेय ते पदवी पर्यंतचे शिक्षण कोलकाता येथेच झाले.

जागतिक दिवस :

ख्रिस्ती वर्षारंभ दिन.

ठळक घटना/घडामोडी :

१८१८ - भीमा कोरेगाव येथे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन. एफ्‌. ए‍फ्‌. स्टाँटन यांच्या नेतृत्वाखालील फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसर्‍या बाँबे नेटीव्ह इन्फन्ट्री बटालियनने पेशव्यांच्या नेतृत्वाखालील २५,००० संख्याबळाच्या मराठा साम्राज्याच्या सैन्याचा पराभव केला.

१८४८ - महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.

१८६२ - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.

१९१९ - गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमंलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.

१९३२ - डॉ. ना. भि. परुळेकर (डॉ. नारायण भिकाजी परुळेकर) यांनी ‘सकाळ’ हे वृत्तपत्र सुरु केले.

२०१० - आत्मघातकी दहशतवाद्याने पाकिस्तानच्या लक्की मारवात गावात चालू असलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या ठिकाणी कारबॉम्ब स्फोट केला. १०५ ठार, १०० जखमी.

२०१३ - कोट दि आईव्होरच्या आबिजान शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होउन ६० व्यक्ती ठार, २०० जखमी.

जन्म/वाढदिवस :

१८९२ - महादेव हरिभाई देसाई गांधीवादी कार्यकर्ते.

१८९४ - सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.

१९०२ - कमलाकांत वामन केळकर भारतीय भूवैज्ञानिक.

१९३६ - राजा राजवाडे, साहित्यिक.

१९४३ - डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर(रमेश माशेलकर), पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार विजेते, भारतीय शास्त्रज्ञ.

१९५१ - नाना पाटेकर, अभिनेते, दिग्दर्शक.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१७४८ - योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ.

१९५५ - डॉ. शांतीस्वरुप भटनागर, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts
© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top